तुझे सारे पूर्वीच ठरलेले असते तरीही बदल होतोच तो बदलही पूर्वीच ठरलेला असतो त्याला प्लान बी म्हणायचं हे हि पूर्वीच ठरलेलं असतं. मी आपला अनप्ल्यानड असतो मला स्पॉंटिनीअसपणा आवडतो अस मी म्हणतो. आणि तू मला अनऑर्गनाईस म्हणते मग मी तुला स्टिरिओटाईप म्हणतो त्यावर तू मला लेझिनेस चा एव्हरेस्ट म्हणते आणि मी त्यावर तुला ऍक्सीडेन्ट प्लॅनर कारण तू ठरवलंस तर अपघात हि प्लॅन करशील. ह्या सगळ्याला आपण शुद्ध मराठीत जेनुइन कूल कन्व्हर्सेशन म्हणतो. आता आवाज वाढणे आणि आदळ आपट होणे हे प्रेमात ग्राह्य आहेच. पण माझं हे मत आहे कि उनाड भटकंती आणि नियोजित यात्रा ह्यातला फरक त्यांनाच कळतो ज्यांना अचानक ऑफिस सोडून हाय टाइड बघायला मारिन ड्राइव्ह वर जाता येतं. तुम्ही तुमचं आस्तित्व शोधण्यात गुंग असता खरच तुमची महत्वाकांक्षा फार मोठी असते. मी आपला मजा करतो जगतो अस्तिव माणसांचं आणि अस्तिव खुद्द ह्या तुलनेत वेळ घालवायला नसतो माझ्याकडे .