जंगलाच्या वाटेने गोठणाऱ्या ठण्ड रात्री गाडीच्या हेडलाईट समोरून अचानक काहीतरी निघून जातं विजेच्या झटक्यानं, शिंगाना गवसणी घालून पाठीवर आरूढ. धड धड वाढते. केवढे ते विस्तृत शिंग तीक्ष्ण आणि रात्र चवताळून अंगावर येते धावून. आपण त्याच प्रकाशात बघतो रस्त्याच्या कडेन झुडूप पार करत दिसतात चमचमणारे डोळे मात्र तो विचार तिथेच मरून पडला असतो. काय करावं? हे प्रेत गाडीत न्यावं सोबत ? कि फक्त नख न्यावी गळ्यात घालायला? कि मुंडकं न्यावं कापून भिंत सजवायला? इतके रानटी विचार येतात कुठून ? इथवर तो नाहीसा होतो रस्त्यावर काळा डाग उरतो. असेच कित्तेकदा अचानक एक झुडूप पार करून दुसऱ्या झुडपाआड जातांना आपल्या हिंस्त्र नजरेनं तो माझ्याकडे बघतो दरवेळेस मी हमखास त्याच्यावर गाडी चढवतो आणि दर वेळेस वाटत एखाद्यावेळी गाडी बंद पडली तर ?