Skip to main content

रानातल्या वाटेवर


जंगलाच्या वाटेने गोठणाऱ्या ठण्ड रात्री
गाडीच्या हेडलाईट समोरून
अचानक काहीतरी निघून जातं
विजेच्या झटक्यानं, शिंगाना गवसणी घालून पाठीवर आरूढ. 
धड धड वाढते. केवढे ते विस्तृत शिंग तीक्ष्ण
आणि रात्र चवताळून अंगावर येते धावून.
आपण त्याच प्रकाशात बघतो
रस्त्याच्या कडेन झुडूप पार करत
दिसतात चमचमणारे डोळे
मात्र तो विचार तिथेच मरून पडला असतो.
काय करावं? हे प्रेत गाडीत न्यावं सोबत ?
कि फक्त नख न्यावी गळ्यात घालायला?
कि मुंडकं न्यावं कापून भिंत सजवायला?
इतके रानटी विचार येतात कुठून ?
इथवर तो नाहीसा होतो रस्त्यावर काळा डाग उरतो.
असेच कित्तेकदा अचानक एक झुडूप पार करून
दुसऱ्या झुडपाआड जातांना
आपल्या हिंस्त्र नजरेनं तो माझ्याकडे बघतो
दरवेळेस मी हमखास त्याच्यावर गाडी चढवतो
आणि दर वेळेस वाटत एखाद्यावेळी गाडी बंद पडली तर ?

Comments

Popular posts from this blog

प्रश्न

।। प्रश्न ।। तू जरा  नाक फुगवून रुसून बसते,  उगाच, अकारण  लपवून काही पुटपुटते.   पौंगंडाचे लाडीक वेडे  वय तुझे खरपूससे.  मला वाटले  गालावरच्या पुरळाचे  किंवा काजळ पसरल्याचे  असेल नीताचे गाऱ्हाणे.  ती पुसते रागाने पण निरागस लाजेने  का दिले दैवाने स्त्रीस हे स्तनाचे ओझे ?  समानतेच्या शतका नंतर  अजुन उरले हे कोडे ?  मी पुरुषासम सक्षम  मी नजरेने नभ मोजीते.  मी म्हणालो -  पुरुष तसा कोमलमन स्त्री शक्ती त्याची,   तो बुरुज उभारी परी  तू  माती त्याची.  ती म्हणाली  समज नको उथळशी  हे उत्तर नाही प्रश्नाचे  गूढ कोणते छातीचे ?  मी बावरलो क्षणिक,  उत्तर कसे ते दयावे  हे वय असे, ना दिलासा निर्रुतराने  मी म्हणालो  आईने व आजीने मला न कोणी सांगितले  पण ऐक सांगतो  ताऱ्यांच्या पलीकडचे  कालाच्या उदयानंतरचे  सृष्टीच्या सुरवातीचे  सहस्त्र शिरीश्यांनच्या पुरुषाने  यज्ञाच्या योजनेने ब्रम्हांड बनविलें  हे तू ऐकिले असावे, तेव्ह...

सार -आसार 1

सूर्याची किरणे येतात अगदी सरळ रेषेत  अंगणात, गर्भगृहात, आणि डोहात  मृत्यू कसा येतो हे त्यांना विचारावे का ?  कुंठित प्रश्न अडकलेला दर्भात. 

उब

शहरावरचे काळे आकाश कोसळत आहे घरांवर, थेंबांनी नव्हे राखेने . लोक विचारतात ऋतू बदलणार का? कुतूहलाने नव्हे कुत्सितपने. रोज त्याचवेळी त्याच प्लॅटफॉर्मवर पकडतात तीच लोकल, आवडती जागा मिळाली नाही ह्याचही दुःख मिरवतात दिवसभर माणसे. जांघेमधल्या खाजेगत अकारण चिडतात माणसे. अकारन नाक मोठ्यानं शिंकरतात, खोकल्यावर जोराने स्वास घेतात, अकारण खांद्यांतून वाकून चालतात, अकारण इतरांच्या चुका काढतात, अकारण दारू पितात माणसे, अकारण सहवासही करतात माणसे. अकारण जगतोय का आपण? इतकं ठामपणे विचारतात की समोरच्याला लाज वाटावी स्वतःच्या जगण्याची आणि ऋषींसारखी ह्याच्या चेहऱ्यावर दाढी सत्वाची लिफ्ट बंद असली कि जिने चढतांना उतरतांना नाकात शिरतो दुर्गंध, ढेकणा सारखा! चिडक्या माणसांच्या घरांना लटकलीय वटवाघुळे त्यांच्याच चेहऱ्यांची सवयच असते ह्यांना विष्टा साचवण्याची. वारंवार सांगतात मला गरज नाही कुणाची. टोळी जवळ येणाऱ्या नर माकडांना आधी टोळीतल्या नराला पराभूत करावं लागत तेव्हाच मिळतात मादा, खायला ओली कणसे प्रेमाशिवाय संभोगाला तयार होतात ती माणसे . उबेसाठी जिथे तिथे स्पर्श शोधतात माणसे इ...