हे सारं दोघांचं आहे
हे आपण दोघेही म्हणतो.
तरीही मी म्हणतो बघ तुला काय आवडतंय तस !
पण पडद्यानं पासून उशीच्या अभ्रात्यांपर्यंत
मी माझ्या आवडीचं घ्यायला लावलं
हे तुझं म्हणणं.
कॉमर्स वाल्यांना सौन्दर्यशास्त्र हि शिकवा
असा पत्र शिक्षण मंत्र्यांना पाठवावं
असं सारखं वाटतं.
असो!
मी म्हणतो काहीही असो
मला एक फील वेगळा लागतो.
हो !म्हणजे अगदी टूथब्रशही
तुझ्याच आवडीचे?
माझी माघार.
मग गिरणीत काम करून
पीठाशिवाय रहाणं जमलं नाही म्हणू
की वखारीत कोळश्या शिवाय म्हणू .
माझे तुझे रंग एकसारखे व्हयला लागले
इतका माझा इगो तू पाळला मांजरासारखा
आता मला आवडलेल तुला
आवडायला लागल
हे सगळ्यात वाईट झाल.
तू कधी कधी इतरांना सागते
इम्प्रोव यौर टेस्ट !
माझ्या खांद्यावर
एक पक्षी बसतो ,
मला तो कावळाच वाटतो.
तुला तो बगळा,
इतक माझ्या मुळे तू बदलव
इतका मीही आजून बदललो नाही ग!
Comments
Post a Comment