आभास आणि विश्वास
दोन्ही शब्द हाती धरून
एका गडद अंधाऱ्या खोलीत
मी शोधतो काळी मांजर
तीची चाहूल असते प्रचिती
आवाज असतो अनुभूती.
हे आई नसलेल्या ईश्वरा बद्दल.
रात्रीच्या किर्रर्रपणात
वाजतो तो गुलमोहर
खुळखुळ्याच्या नादात
अंधुक करतो अंधाराच्या
पुसकट शार रेखांना.
तुझ्या केसांचं
एक मुलायम स्वप्न
गालांना गुदगुल्या करत,
ती तेवणारी पणती
रात्र भर सांभाळते
मिणमिणत बाळ जोतीचं
ममतेला पर्याय फक्त ममतेचं.
तू आई होतांना
तुझा चेहरा बदलतोय कमालीचा
मी कौलांना रंग देतोय गेरूचा.
बापानं पावसाआधी छत नीट
करावं एव्हडा आदेश नियतीचा.
दोन्ही शब्द हाती धरून
एका गडद अंधाऱ्या खोलीत
मी शोधतो काळी मांजर
तीची चाहूल असते प्रचिती
आवाज असतो अनुभूती.
हे आई नसलेल्या ईश्वरा बद्दल.
रात्रीच्या किर्रर्रपणात
वाजतो तो गुलमोहर
खुळखुळ्याच्या नादात
अंधुक करतो अंधाराच्या
पुसकट शार रेखांना.
तुझ्या केसांचं
एक मुलायम स्वप्न
गालांना गुदगुल्या करत,
ती तेवणारी पणती
रात्र भर सांभाळते
मिणमिणत बाळ जोतीचं
ममतेला पर्याय फक्त ममतेचं.
तू आई होतांना
तुझा चेहरा बदलतोय कमालीचा
मी कौलांना रंग देतोय गेरूचा.
बापानं पावसाआधी छत नीट
करावं एव्हडा आदेश नियतीचा.
Comments
Post a Comment