Skip to main content

भगवा ते लाल

हे हिंदवी स्वराज्याचे वारे हलके होऊन
मशिदींच्या हिरव्या झेंड्यांना फडफडत निघून जातंय.
गुलाल उधळला जातोय, भगवी पताका नाचत मिरवणूक पुढे जात आहे.
रस्त्या काठच्या झोपडीतली मुलं किती उत्साहानं पुढे नाचत आहे
ढुंगाणावरच थिगळ पुन्हा फाटत आहे. अजान की बोम्ब काही कळत नाही आहे.
घोषणा होत आहे स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे
झोपड्या तोडून जेष्ठ नागरिकांसाठी बाग बनणार आहे.

आपल्या खिडकीतून किती अडचण होतेना हे सगळं बघायला
गॅलरी असायला घर पुण्यात असावं लागत हे तुझं उत्तर ( तो टोमणाचं आहे )
गावी बैठं घर आहे, ते लंकेत सोन्याच्या विटां एव्हढंच कामी येतंय
छप्पन इंची स्क्रीनचा टीव्ही डिस्काउंट मध्ये मिळेल २६ जानेवारीला
ट्रॅव्हल चॅनेल किती छान दिसेल आपल्याला.

परवा फूटपाथ वर आक्रमण केलेल्या एका झोपडीत एसी बघितला,
लाज वाटली स्वतःची, मग पालिकेची, त्यांच्या कडे विजेचं मीटर आहे. ( बोमला )
तो म्हणतो अच्छे खासे दिखते हो भाव क्यो करते हो ?
सब्जी सीधा  नासिक से आया है .
 रेल्वे पँट्री बाजूला गटाराच्या पाण्याने
 हिरवी झालेली मग अफिमच आहे का?

हाकलून लावावे वाटतात रानडुकरे, विचारांची! पण
आपल्या किचन सिंकवरही आपला ताबा नाही. ( उपरती )
शेवटचे राजे बुरुजावरून बघतात खिन्न भूभाग तसच
सावरकरांच्या फोटो कडे बघून उगाच वाटतं काही बाही.

मग ती आठवण करून देते
पटकन टीव्ही लाव खूप दिवसाने लागणार आहे
जो जिता वही सिकंदर -पेहला नशा पेहला  खुमार
लाल सलाम नाहीसं होतं उडतो हवेवर स्वेटर लाल.


Comments

Popular posts from this blog

प्रश्न

।। प्रश्न ।। तू जरा  नाक फुगवून रुसून बसते,  उगाच, अकारण  लपवून काही पुटपुटते.   पौंगंडाचे लाडीक वेडे  वय तुझे खरपूससे.  मला वाटले  गालावरच्या पुरळाचे  किंवा काजळ पसरल्याचे  असेल नीताचे गाऱ्हाणे.  ती पुसते रागाने पण निरागस लाजेने  का दिले दैवाने स्त्रीस हे स्तनाचे ओझे ?  समानतेच्या शतका नंतर  अजुन उरले हे कोडे ?  मी पुरुषासम सक्षम  मी नजरेने नभ मोजीते.  मी म्हणालो -  पुरुष तसा कोमलमन स्त्री शक्ती त्याची,   तो बुरुज उभारी परी  तू  माती त्याची.  ती म्हणाली  समज नको उथळशी  हे उत्तर नाही प्रश्नाचे  गूढ कोणते छातीचे ?  मी बावरलो क्षणिक,  उत्तर कसे ते दयावे  हे वय असे, ना दिलासा निर्रुतराने  मी म्हणालो  आईने व आजीने मला न कोणी सांगितले  पण ऐक सांगतो  ताऱ्यांच्या पलीकडचे  कालाच्या उदयानंतरचे  सृष्टीच्या सुरवातीचे  सहस्त्र शिरीश्यांनच्या पुरुषाने  यज्ञाच्या योजनेने ब्रम्हांड बनविलें  हे तू ऐकिले असावे, तेव्ह...

सार -आसार 1

सूर्याची किरणे येतात अगदी सरळ रेषेत  अंगणात, गर्भगृहात, आणि डोहात  मृत्यू कसा येतो हे त्यांना विचारावे का ?  कुंठित प्रश्न अडकलेला दर्भात. 

उब

शहरावरचे काळे आकाश कोसळत आहे घरांवर, थेंबांनी नव्हे राखेने . लोक विचारतात ऋतू बदलणार का? कुतूहलाने नव्हे कुत्सितपने. रोज त्याचवेळी त्याच प्लॅटफॉर्मवर पकडतात तीच लोकल, आवडती जागा मिळाली नाही ह्याचही दुःख मिरवतात दिवसभर माणसे. जांघेमधल्या खाजेगत अकारण चिडतात माणसे. अकारन नाक मोठ्यानं शिंकरतात, खोकल्यावर जोराने स्वास घेतात, अकारण खांद्यांतून वाकून चालतात, अकारण इतरांच्या चुका काढतात, अकारण दारू पितात माणसे, अकारण सहवासही करतात माणसे. अकारण जगतोय का आपण? इतकं ठामपणे विचारतात की समोरच्याला लाज वाटावी स्वतःच्या जगण्याची आणि ऋषींसारखी ह्याच्या चेहऱ्यावर दाढी सत्वाची लिफ्ट बंद असली कि जिने चढतांना उतरतांना नाकात शिरतो दुर्गंध, ढेकणा सारखा! चिडक्या माणसांच्या घरांना लटकलीय वटवाघुळे त्यांच्याच चेहऱ्यांची सवयच असते ह्यांना विष्टा साचवण्याची. वारंवार सांगतात मला गरज नाही कुणाची. टोळी जवळ येणाऱ्या नर माकडांना आधी टोळीतल्या नराला पराभूत करावं लागत तेव्हाच मिळतात मादा, खायला ओली कणसे प्रेमाशिवाय संभोगाला तयार होतात ती माणसे . उबेसाठी जिथे तिथे स्पर्श शोधतात माणसे इ...