एकांताचा पहिल्या भेटीत
एकांताचा पहिल्या भेटीत
मागच्या सर्वच भेटीनचं ऊन उबदार झालेलं
आठवतेना तुला?
मुंबईतल्या रटाळवाण्या प्रिन्सेस नेकलेस वर
इतर प्रेमी युगलांच्या उद्दात उपस्थित
आपणही भेटलो होतो दोन तीनदा,
एकदा नेमकी ओहोटी होती, जोडपी अंधाराला लाडावून
क्योबॉइडला जवळ घेत होती.
ते खट्याळ पोर ओठांच्या जुळण्या आधीच
एक गुलाब मध्ये आणायचा - "दहाला एक"
मग त्याचं लाजणं, आपलं हसन. मज्जा !
मग मोरेश्वर दोनशे चार,
शांत आणि स्तब्दतेचे क्षण चार
मग उगाच हसन, आणि काहीही प्रश्न
ज्याचे उत्तर शब्दा पेक्षा छोटं.
पाठीवरचे बंद सोडले जाऊन
एका व्यक्तीच अख्ख वजन पेलवणार का ?
अश्या धस्स छातीनं उमलत राहिला केवडा
मलाही त्या सुघंधान भोवळ आली बहुदा,
मी उगाच काही नसतांना तुझ्या
गालावरुन पापणी दूर केल्यागत केलं
तू ओढणी आवरत माझ्या शर्टचा पोत केलास मुलायम
मग अबिदा परवीनच गाणं आवडतं का
असं विचारून मी सुफी "पिया " बद्दल बोललो
कॉफी पिताना तो हॉरर फिल्म मधला व्हिलन
उंच बिल्डिंग वरून पडला तेव्हा हायस झालं.
धड धड थांबली.
खिडकी खाली मुलांचा गोंगाट आपण
पडदे सारून उपभोगला
तुझ्या माझ्या बोटाना तेव्हडा
मिठीचा अर्थ कळला.
आठ्वतेना तुला?
माझ्या तुझ्या प्रत्येक भेटीत
आपण किती गोष्टी सावरत होतो
माझी कोल्हापुरी, तिचा अंगठा तुटलेला
तुझ्या छत्रीने आपला नाजूक पणा दाखवलेला
कोणता होता तो खडू ज्यानं माझ्या साठी
हा चोकोन आखला
त्या चुन्याच्या रेषांवर हा पसारा मांडला .
Comments
Post a Comment