एकन एक दिवस असा जातो
काही काही मनाला खेळवुन ठेवत नाही.
मग वीज कडाडली काय किंवा गार झाली काय,
मोर सुरांवर थकला काय आणि नाचून मेला काय,
ओझ्या खालचं डोकं झिजण्यासाठी
मानेवर चेहेऱ्यासकट लावावं लागलं तरी काय?
ओल्या सुक्या फुलांच्या स्पर्शानेच काय,
पण चिकण्या जाघेंवरून मध जरी वितळले
तरी आत काही पाझरत नाही.
कोरडा दगड कोरडा रहातो,
पाऊस पाण्यान भिझला म्हणून मऊ होत नाही.
विटेवर चैतन्याचे अंतरिक्ष,
गाभार्याला प्रतिध्वनीचे स्वर,
आपले आपण ऐकतो किंवा तुळशीदळाच्या
तिखट स्वादाने जिभेचे सुटतात जाळे,
रामदासांच्या करुणाष्टकांतून
काचेवर खिळलेल्या किंचाळी पलीकडेही
डोळ्याच्या खाचांना आंधारचे प्रेम जडले तरीही
काही काही होत नाही.
स्वतःची पिल्लं खाणाऱ्या
मांजराला पळतोय, तुला माणूस म्हणायचं?
कुणाच्या प्रेताला कुणाच्याही नावे जाळा
त्याच पैश्याने दारू पिऊन
स्वतःच्या प्रेताला घरी नेतांना
तो तुला वाटेत भेटतो
तु त्याच्या गाडीला आणि गांडीला सलाम करतो,
आदरभाव दाखवतो, तुला माणूस म्हणायचं?
अरे मध्यमवर्गीय म्हणून
सभ्य सभ्य म्हणुन, होतं ते चांगलं म्हणुन,
घाम म्हणुन सुटलेल्या लाजेला,
हात रुमालानं पुसतो
असह्या होतं तेंव्हा जोर देऊन
टॉयलेट मध्ये हुंदके काढून
मूळव्याध कोवळी करतो .
चीड येते तेव्हा तर तू सोशल
नेटवर्कवर स्टेटस बदलतो, पॉलिटिक्स पेक्षा पॉर्न बरं
म्हणून स्क्रीन लपवतो,तुला माणूस म्हणायचं?
झाल्यास शिव्या घ्या
कुणीतरी मेंढरांना बसवत
तसे काही धरणे करा,
उपोषण नको मग आपलं तंबू, गाणी, भाषणं
टीव्ही वगरे वर बोलणार्याच्या मागे
तुला माना हलवतांना बघितलं आहे.
आपल्याच दंगलीत आपलच घर जाळायचं
मोबदल्याच्या रांगेत उर्मटपणे उभं रहायचं
फ्याशन नुसार दोन शिव्या डाव्यांना
दोन शिव्या उजव्यांना.
समोरच्याला धक्का द्यायचा, मागच्यावर खेकसायाच
कुणावर तरी पडायचं, शीघ्रपतन झालं म्हणून रडायचं
तुझ्या रंध्रात रासायनिक खतं उरली आहे फक्त, तुला माणूस म्हणायचं ?
Comments
Post a Comment