तेव्हा छपरं होत डोक्यावर
आणि विहिरीला पाणी होतं
कुपन तिरिप असलं तरी उभं होतं.
होती पाचही बोट साबीत, सरळ
घास न सांडवता घेता यावा इतकी
पाच बोटांच्याच सारखे होते पोट,
हागवण हि वर्ष्यातून एकदाच लागायची. ( हे थोडं अतिरेकीच )
पण माझ्या हातांशिवाय हि आहेत हात
थकलेल्या रात्रींना थोपटणारे
भाकरी न करपता चंद्राचे आकार बनवणारे
ज्या हातांना ओंजळ बनून फक्त देता येतं, असे
भाग्यवान म्हणवुन घेण्याचंही भाग्य होताच
कारण जीभ होती, पदार्थांना शरणगेली असली तरीही
तीला आवरता येणार नाही इतकी सुटलीहि नव्हती
लाळ कश्याही साठी गाळण्या आधी गिळायची सवय होती.
जेव्हढ्या शिव्या यायच्या त्याच्या पेक्षा जास्त ओव्या पाठ होत्या
हे बेरजेचं, नाहीतरी तिरसट बोलून माणसे गमवण्याचे चार अनुभवहि होते.
साध्याच शब्दात लिहायचं असे निर्धार हि होते कविते साठी
शाई ही होती कागद ही होता,
अश्रू पाण्या इतकेच गढूळ,
दुःख कातरणीचा अस्पस्ट तार होते
त्यांना यांना सगळ्यांना काहीही नवखं वाटावं असं नवीन काही नव्हतं
हे साधारणपण भाग्यवान होण्याचा उचांक होता.
माणूस असल्याची सगळी अवलक्षणे होती
शब्द फिरवण्याचा मानवी स्वभाव होता, राग होता,
तेव्हडाच भ्याडपणाही लेंग्याच्या नाडीने बांधला होता.
तस बरच आहे, होतं आणि राहील
हे खरकटं तोंड कित्तेक सुखानं माखलं आहे.
Shrikant Puranik
Shrikant Puranik
Comments
Post a Comment