ती नेहमी म्हणते
"मी तुला सांगितल होत".
ती म्हणते सगळ काही ऐकलं होत,
ती म्हणते एकाच गोष्टीला कितींदा उगाळायचं
कित्तींदा एकाच जखमेवर मीठ तरी चोळायच
ती म्हणते कारल्यालाची गोडी असते खरे पणाची
ती म्हणते आळशी लोक्कांना किंमत नसते कुठल्याच पणाची
ती काही न काही म्हणत असते तेव्हा सगळ ठीक असत
उन्हाला उन्हा इतकं भाजता येत असत,
पण तिच्या गप्प रहाण्याला मी काय म्हणु
कलही केलेल्या मोठ्या गुंडातुन येनारा मुका आवाज
कान लाऊन मुद्दाम ऐकावा तसं.
तू रात्रीला चांदण्यांच्या ठिपक्यांचे गोंदण देते,
मी सकाळी दवाने भिजलेला आसतो.
परत तुझ्या आवाजाला बासरीतून फिरावच लागतं,
मांजराच्या पिल्लाना चिमटीने उचलावच लागतं,
इतक्या मऊ तुझ्या बोटांना पंखही होता येत,
इतक्या मऊ बोटांना चिमटाही होता येत.
ती नेहमी म्हणते तू काही तरी बोलून मला गप्प करतो
माझाच सार चुकल्याच आगदी सहज भासवतो
ती नेहमी म्हणत असते तुला माझ म्हणन
कधी पटणार नाही.
मनीप्लांट ला फुल येणार नाही.
Comments
Post a Comment