Skip to main content

उत्तर

मी त्याला बघितलं तेव्हा वाटलं
ह्यात जगण्यासारखं बरच काही उरलंय .
बहुदा जगण्यातली जिज्ञासा नाहीशी झाली असावी
किंवा प्रज्ञा जागृत झाली असावी. 
हे माझे साधे अनुमान ( निशुल्क ) 
पण अनुमानाने निष्कर्ष कसे काढणार.

तो काचेवर नजरेचे दगड मारतो
सगळं सगळं तोडून समोरच्या उंच मजल्यावर तो निशाणा साधतोय
की समुद्राच्या अगदी मधोमध लाटांवर वार करतोय,
 हे माझे साधे अनुमान ( निशुल्क ) 

तो म्हणाला मी केवळ पार्थिव शरीरासारखा उरलोय,
मी धावणारा दिवस आहे कि न संपणारी रात्र
मी शोधतोय माझी संध्याकाळ किंवा पहाट
हे इतकं अस्पट्ट
बीव्हर झालाय माझा
मांजरीचं तोंड असलेला उंदीर !
मी खोदतो फक्त माती जिथं मातीच उरते अंताला.

मी म्हणालो:-  सांभाळ !

तो गुढग्यांतून वाकण्या आधी सरळ झाला,
तेव्हा अनावर झालेला दोरखंड माझ्याकडे फेकून तो म्हणाला.
तुही मणक्यांच्या जोरावर उभा आहेस अधांतरित
ही आहेका तुझ्या अस्तींची तुझ्यावर निष्ठा?

मी म्हणालो तुझ्या बोलण्याचा काळ चुकतोय
मला आज माझा कळतोय.

तो म्हणाला
बंधाऱ्याच्या पाण्याला शेवाळाची साथ
शिवी घालावी इतकाही... तोंडात उरला नाही काथ.

मी म्हणालो 
बिमा एजंट पेक्षा मी बेरजेचं विचार करतो
वेळ काढून नेतो, जितका नेपोलियन होतो
तितकाच शय्याप्रिय शहीदही होतो.
कविता नकली सिगारेटची गुंडाळी नाही हे जाणतो.
पुरुष असण्याच्या सभ्यतेत लेखणी घुमवतो.
माझ्या महत्वकांक्षा सुंदर जगण्या पेक्षा काही नाही
मला आत्महत्येसाठी लागणार काळीज नाही.

 तो म्हणाला आणि बोलताच राहिला
सर्व कळायला हि प्रारब्द् लागत !
 हे माझे साधे अनुमान ( निशुल्क ) 

प्राण असतो जादूगारांचा भलत्याच पिंजऱ्यात.
जगायचं कुठे ? भोगायचं कुठे ?
जाणिवेच्या खोल विहिरीत अंधाऱ्या
प्राणांचे पिंजरे शोधायचे कुठे.









Comments

Popular posts from this blog

आलिंगन

 आलिंगन  तुझे ओठ पलाशच्या टंच पाकळ्या होतात, तेव्हा मी पारंब्यांच्या जाळीतून धनेश उडतांना बघतो.  ध्यान एकाग्र करतो भुवयांमध्ये, चंदनाचा गंध दरवळतो, तुझे केस जाळं पसरल्यागत विखरू लागतात, मी गार भस्म होतो.  तुझ्या काजळाच्या रेषा अजूनच तीक्ष्ण होतात, मला तिमिराच्या कोसेतून मुक्त होणारा नाग दिसतो.  स्वप्नांत कळतं का कधी स्वप्नाचं वेळभान? केवडा विषावर घेरतो, तुझी बोटे छातीवर फिरतात, शिवारावर शिंगरू थबकतो, मी गप्प होतो.  तुझ्या गोऱ्या वक्षाशेजारी निळी हिरवी वेल तप्त होते, उंच फांदीवर बसलेलं जनावरं ढिबक्यांचं टापदिशी खाली येतं.  मी ओंजळ रिकामी करतो, एकटं रेषांचं  झाड बगळ्यांनी भरू लागतं  उबदार तुझ्या श्वासांनी माझे कान हलके होतात, हवेत मारवा स्तिर होतो . 

फांदीवर

पूर्वी शेजारी असायचे  बडबड, गप्पा मारायला  सगळ्यांनाच आवडायचं  गाह्रानी गायला.  आता उरलेत कावळे  तेही आज उडाले  कोण छतावर  काय वाळवण घातले  समोरच झाड शोभेसाठी जपून ठेवलय सोसायटीने   एक घरटं आहे  मादा कोण आणि नर कोण  मन कावळ्यातही वर्चस्व आणि दडपण शोधात आहे.   माझी घालमेल झाली कि  मला सारखं आठवतं  कावळा कुरडतडतो जिवंत सरड्याला  का वळला असेल तो  माझ्याच काचे कडेला ? आपण मुद्दाम दुपारचं  ऐकावं राजन साजन मिश्र  आणि हा एकाच  कवकवकण्याचे  सूर बदलतो आहे.  सूचना आणि तेच ते  घरातही हे न ते  सारखं मला  आठवून देत आहे.  किचनच्या खिडकीत आल्यावर   पोळ्याचें तुकडे पळवायचे  पण बंद काचेला चोची मारून  तू काय मिळविले आहे.  सवयीचा भाग आहे असं म्हणायला आयुष्य  फार काही प्रॅक्टिकल झालं नाही  पण तुझ्या शिवाय करमत नाही  हे माझं म्हणणं मुळीच नाही.  कुणी कावळा पाळलेला  आठवत नाही  पिंडाला शिवण्यासाठी  दर्भ असेल तर खऱ्या  कावळ्याची गरज नाही.  खिन्न होते शांतता रात्रीची काही हालचाल नाही  कुणास ठाऊक का  काळोख

दगड

  एकन एक दिवस असा जातो  काही काही मनाला खेळवुन ठेवत नाही. मग वीज कडाडली काय किंवा गार झाली काय, मोर सुरांवर थकला काय आणि नाचून मेला काय, ओझ्या खालचं डोकं झिजण्यासाठी  मानेवर चेहेऱ्यासकट लावावं लागलं तरी काय? ओल्या सुक्या फुलांच्या स्पर्शानेच काय, पण चिकण्या जाघेंवरून मध जरी वितळले  तरी आत काही पाझरत नाही. कोरडा दगड कोरडा रहातो,  पाऊस पाण्यान भिझला  म्हणून  मऊ होत नाही. विटेवर चैतन्याचे अंतरिक्ष,  गाभार्याला प्रतिध्वनीचे स्वर, आपले आपण ऐकतो किंवा तुळशीदळाच्या  तिखट स्वादाने जिभेचे सुटतात जाळे,  रामदासांच्या करुणाष्टकांतून  काचेवर खिळलेल्या किंचाळी पलीकडेही  डोळ्याच्या खाचांना आंधारचे प्रेम जडले तरीही  काही काही होत नाही.  स्वतःची पिल्लं खाणाऱ्या  मांजराला पळतोय, तुला माणूस म्हणायचं?  कुणाच्या प्रेताला कुणाच्याही नावे जाळा त्याच पैश्याने दारू पिऊन  स्वतःच्या प्रेताला घरी नेतांना  तो तुला वाटेत भेटतो  तु त्याच्या गाडीला आणि गांडीला सलाम करतो,  आदरभाव दाखवतो, तुला माणूस म्हणायचं?  अरे मध्यमवर्गीय म्हणून  सभ्य सभ्य म्हणुन, होतं ते चांगलं म्हणुन, घाम म्हणुन सुटलेल्या लाजेला,  हात रुमालानं पु