अश्वारोही दिसत नाही
ऐकू येतात
टाप
भोगावे
निर्लज्ज पणे
स्वातंत्र्याचे शाप.
झिंगून
अथवा
पृथ्वी फिरून गोल गोल
चक्कर येऊन
शुष्क पिंपळ पानासारखा
गळतो
तो
तेव्हा मावळतीचा
सूर्यही
घुट घुट
दुःख गिळतो.
उभा राहतो
एक दुसरा
तीच मशाल
हाती धरून
पुटपुटतो
अंध म्हणा हवेतर.
हे बघून
तिसरा म्हणतो
तो बघा
ह्यानेच वाटोळं केलं
सगळा
अंधार फ़ाडलाय
म्हड्यान.
त्यावर
चोथा किंचाळतो
तिसर्यावर
हाच तो
ह्याने
शब्द फेकून
आवाज मारलाय.
मग रक्त
का नाही
हातांवर
गळलेला मग
विचारतो
माझ्या पाठीत
कोणी
सूरा खुपसलाय.
अर्धमेल
शरीर माझं
उभं रहावं
इतकं प्रेम
माझं नाही
पायांवर .
Comments
Post a Comment