पूर्वी शेजारी असायचे
बडबड, गप्पा मारायला
सगळ्यांनाच आवडायचं
गाह्रानी गायला.
आता उरलेत कावळे
तेही आज उडाले
कोण छतावर
काय वाळवण घातले
समोरच झाड शोभेसाठी
जपून ठेवलय सोसायटीने
एक घरटं आहे
मादा कोण आणि नर कोण
मन कावळ्यातही
वर्चस्व आणि दडपण शोधात आहे.
माझी घालमेल झाली कि
मला सारखं आठवतं
कावळा कुरडतडतो
जिवंत सरड्याला
का वळला असेल तो
माझ्याच काचे कडेला ?
आपण मुद्दाम दुपारचं
ऐकावं राजन साजन मिश्र
आणि हा एकाच
कवकवकण्याचे
सूर बदलतो आहे.
सूचना आणि तेच ते
घरातही हे न ते
सारखं मला
आठवून देत आहे.
किचनच्या खिडकीत आल्यावर
पोळ्याचें तुकडे पळवायचे
पण बंद काचेला चोची मारून
तू काय मिळविले आहे.
सवयीचा भाग आहे असं म्हणायला आयुष्य
फार काही प्रॅक्टिकल झालं नाही
पण तुझ्या शिवाय करमत नाही
हे माझं म्हणणं मुळीच नाही.
कुणी कावळा पाळलेला
आठवत नाही
पिंडाला शिवण्यासाठी
दर्भ असेल तर खऱ्या
कावळ्याची गरज नाही.
खिन्न होते शांतता रात्रीची
काही हालचाल नाही
कुणास ठाऊक का
काळोखात कावळ्याची
चाहूलही लागत नाही.
Comments
Post a Comment