एक कबुतर आले खिडकीत मुद्दाम बसले
कबूल त्याचे गुलाबी पाय मी लपून पहिले.
कित्ती वेळच वारा हलवत राहिला पानांना
दुः ख माझे हसरे, तरी वेदना हिरव्या देठांना
अर्थचिंब भिजली मुळे, पान पान राहिले सुके.
पुन्हा तुझी आठवण येते, पुन्हा चन्द्र रुतु लागतो
पुन्हा अस्ति माझ्या मी खोल पुरु लागतो.
हे दिवस निरस असे, ते होते रंग दिवाने
रक्तावीना उमलले पळस फुल जांभळे.
ते अभ्यंगातून सुचिर झाले मिठीत मिटणारें सारे
जळून विस्तीर्ण कापराचे क्षण विरक्त झाले कसे
हाती हात धरून तू वाचलीस पत्रे तुझीच
शब्द तरंगतात इथे भास सारे आरसे तुझे
Comments
Post a Comment