Skip to main content

Posts

Showing posts from 2021

तुझी शंभर स्वप्ने एका रात्री बघतो मी

 तुझी शंभर स्वप्ने एका रात्री बघतो मी  जागा होतो तेंव्हाही तुझ्याच गंधाने दरवळतो मी. कधी वाटते तुझी कुंडले  सापडतील मज अभऱ्याखाली. कधी वाटते खांद्यावरती  केस तुझे निखळले राहतील. तुझी शंभर स्वप्ने एका रात्री बघतो मी  माझेच मला मिठीत घ्यावे इतका हर्षून जातो मी. कधी वाटते खरो खरीच  तुझ्यासवे जगतो मी  तेव्हा तेव्हां अलगद कळते  गोकुळातच असतो मी. तुझी शंभर स्वप्ने एका रात्री बघतो मी  अंतरंग अंतरिक्षाचे व्हावे असा स्वप्नमय होतो मी. कधी वाटते प्राणांतिक गात्रे  तुझ्या स्पर्शाने पवित्र होतील  कधी वाटते चंदन सारे  अंगावरती बहरून येईल. कधी वाटते कळेल  सारे  राना मधल्या मोरांनाही  कधी वाटते प्रभाकरही  रश्मीला  धाडेल दुपारी तुझी शंभर स्वप्ने एका रात्री बघतो मी  रज्जुमधल्या कणाकणाला वाहवलेला कळतो मी. इतक्या इतक्या लांब रात्रींना  रात्र तरी म्हणू कसा मी  उजळतात चक्षुतून सूर्ये  जेव्हा तुझी स्वप्ने बघतो मी. 

दगड

  एकन एक दिवस असा जातो  काही काही मनाला खेळवुन ठेवत नाही. मग वीज कडाडली काय किंवा गार झाली काय, मोर सुरांवर थकला काय आणि नाचून मेला काय, ओझ्या खालचं डोकं झिजण्यासाठी  मानेवर चेहेऱ्यासकट लावावं लागलं तरी काय? ओल्या सुक्या फुलांच्या स्पर्शानेच काय, पण चिकण्या जाघेंवरून मध जरी वितळले  तरी आत काही पाझरत नाही. कोरडा दगड कोरडा रहातो,  पाऊस पाण्यान भिझला  म्हणून  मऊ होत नाही. विटेवर चैतन्याचे अंतरिक्ष,  गाभार्याला प्रतिध्वनीचे स्वर, आपले आपण ऐकतो किंवा तुळशीदळाच्या  तिखट स्वादाने जिभेचे सुटतात जाळे,  रामदासांच्या करुणाष्टकांतून  काचेवर खिळलेल्या किंचाळी पलीकडेही  डोळ्याच्या खाचांना आंधारचे प्रेम जडले तरीही  काही काही होत नाही.  स्वतःची पिल्लं खाणाऱ्या  मांजराला पळतोय, तुला माणूस म्हणायचं?  कुणाच्या प्रेताला कुणाच्याही नावे जाळा त्याच पैश्याने दारू पिऊन  स्वतःच्या प्रेताला घरी नेतांना  तो तुला वाटेत भेटतो  तु त्याच्या गाडीला आणि गांडीला सलाम करतो,  आदरभाव दाखवतो, तुला माणूस म्हणायचं?  अरे मध्यमवर्गीय म्हणून  सभ्य सभ्य म्हणुन, होतं ते चांगलं म्हणुन, घाम म्हणुन सुटलेल्या लाजेला,  हात रुमालानं पु

कसेही आणि काहीही च्या संदर्भात

नकोशी झालेली माणसे जवळच बाळगून  तो  घर सजविण्याच्या कल्पनेत रमतो,  कुणासाठीतरी महागडा बुके विकत घेतो  गाडीच्या मागच्या सीटवर मुद्दाम विसरतो.  चादरीला चारही कोपऱ्यात घट्ट बसवतो  वळ्या दुर करतो, स्वतः सोफ्यावर आडवा होतो.  पहिल्या प्रियेसीच वाढलेल्या पोटावर केलेलं कमेंट  वाचतो आणि डोळे मुद्दाम मिटतो.  शेव्हिग क्रीमच्या जाहिरातीत काय भारी ट्यून आहे  ती गुणगुणत आरश्यासमोर उभा राहतो, एक्सेल शीटच्या रिकाम्या रखान्यात  कानावरचे केस अलगद कात्रीने कापतो.   हरवलेल्या पावसाळी दिवसांची आठवण   मोरपिसांसारखी हळुवारच असावी अशी सक्ती नाहीना?  बंद पडलेलं घड्याळ दिवसातून दोनदा वेळ बरोबर दाखवते  एव्हडे तरी नीट आज आपण वागतोय ना?   बरेचदा प्रश्नही तेच ते पडतात   इतका रटाळवाणा दिवस जातो, ती वारंवार पदर नीट करते आणि  तो    फक्त चष्म्याच्या काचा स्वच्छ करतो.   आजकाल कुणाच्याही भेटीला जातो   काय बोलावे आधी विचार करतो   मरीन ड्राईव्ह पेक्षा कुर्ला स्टेशन वर  तो   एकटाच बसतो गाणी ऐकतो.   रात्री घरीही येतो टीव्हीच्या काळजीने   अलगद इस्त्रीचे कपडे कपाटात ठेवतो   आसमंत दरवाळलेला असतो पत्ताकोबीनें    तो   सॉक्स का