Skip to main content

अजून तू अशी

काही पांढऱ्या छटा तुझ्या कपाळावर दिसु लागल्या 

आणि नजरेत ओढून घेणारे संमोहन उतरू आले. 

थोडी विचलित, थोडी विलगता, थोडे गांभार्य, थोडे प्रेम, 

 छटा होत्या शिशिराच्या, सारेच डोळ्यांत घडू लागले . 


चाळीशीच्या धीराने, केवड्याचे अत्तर दरवळू लागले 

तुझे रूप दाट गुलकंदाचे, मन प्रसादाचे तांबूल झाले.

कुंड्यांमधले, वृन्दावनचे देठन देठ हिरवे झाले, 

पाटीवर नाव माझे सुचक, घर तुझे कृतार्थ झाले.


चंदनाचे होते कि होते खैराचे वा बाभळीचे 

करपलेले तुझे हात घट्ट मळलेले पीठ होते. 

मी दुःख रेखाटून कागदाचे फुल झालो 

जे भोगले तु, ते वाळवणाचे गीत झाले. 


तुझ्या त्वचे खाली इंद्रायणी गुप्त झाली, 

मी उकरून काढतो रक्तबीजाच्या ओळी 

मनधरीनी करिता ही, उजळतो तुझा रुसवा 

ते रुसणेही असते उबदार गुळाची पोळी 


मी परिघावर बिंबित अर्थ शोधतो जगण्याचा                        

फिरतो बाजार शब्दांचा, पटके बांधून डोक्याशी 

तू नसतेस नेटकी साडी, खोचते पदर पोटाशी 

हा सुगंध दरवळणारा, असतोच तुझ्या नाभीशी. 







Comments

Popular posts from this blog

सार -आसार 4

 मिठाच्या नागर्नीला मी हात कुणाचे मागु  आणिली कौतुके तुमची विषाच्या पेरणीला.  आत्म्याचे आस्तित्व हलले , ते सोडू लागले माती  सहानभूती ही तुमची जीव फुटला केरसुणीला.

प्रश्न

।। प्रश्न ।। तू जरा  नाक फुगवून रुसून बसते,  उगाच, अकारण  लपवून काही पुटपुटते.   पौंगंडाचे लाडीक वेडे  वय तुझे खरपूससे.  मला वाटले  गालावरच्या पुरळाचे  किंवा काजळ पसरल्याचे  असेल नीताचे गाऱ्हाणे.  ती पुसते रागाने पण निरागस लाजेने  का दिले दैवाने स्त्रीस हे स्तनाचे ओझे ?  समानतेच्या शतका नंतर  अजुन उरले हे कोडे ?  मी पुरुषासम सक्षम  मी नजरेने नभ मोजीते.  मी म्हणालो -  पुरुष तसा कोमलमन स्त्री शक्ती त्याची,   तो बुरुज उभारी परी  तू  माती त्याची.  ती म्हणाली  समज नको उथळशी  हे उत्तर नाही प्रश्नाचे  गूढ कोणते छातीचे ?  मी बावरलो क्षणिक,  उत्तर कसे ते दयावे  हे वय असे, ना दिलासा निर्रुतराने  मी म्हणालो  आईने व आजीने मला न कोणी सांगितले  पण ऐक सांगतो  ताऱ्यांच्या पलीकडचे  कालाच्या उदयानंतरचे  सृष्टीच्या सुरवातीचे  सहस्त्र शिरीश्यांनच्या पुरुषाने  यज्ञाच्या योजनेने ब्रम्हांड बनविलें  हे तू ऐकिले असावे, तेव्ह...

सार -आसार 1

सूर्याची किरणे येतात अगदी सरळ रेषेत  अंगणात, गर्भगृहात, आणि डोहात  मृत्यू कसा येतो हे त्यांना विचारावे का ?  कुंठित प्रश्न अडकलेला दर्भात.