आम्ही थकलो की घरी येतो
ते थकले की बार मध्ये बसतात
काही थकले तरीही ऊन उतरिणीला
मरिनड्राईव्हच्या तापलेल्या कट्ट्यावर बसतात.
काही नाटकाच्या तालमी बघायला किंवा रिकाम्या गाडीची वाट बघत
बांद्र्याची हिरवळ चष्म्याच्या काचा पुसत लुटतात.
कधी कधी थकलेला असतानांही ते
माडीवरही जातात व परत फिरताना मारोतीला.
चहा बारा वाटतो दिवस उतरणीला
तू मुद्दाम मसाला जरासाच वापरते
बशीत एक चमचा साय. हे बघून हायस होतं
अजून दुधावर साय येते? गोठ्यात गाय हंबरते.
मुले गेली आहेत खेळायला किंवा क्लास ला
मुली कराटे ला, मुले डान्सला.
दार तिरप बंद आणि ऊन परततय
तुझ्या मानेवरचा घामाचा थेंब चमकतोय.
पुढच काय बोलु
ब्यागेत तिच्या साठी गजरा आहे!
डबा काढतांना ती माझ्या कडे डोळ्यांनी हसेल
सोफा कम बेड पाय ताणेंल पुढे सरकेल.
मग मी एक घोड चूक करतो
टीव्हीचा रिमोट हातात घेतो
लगेच बातम्या लागतात
खोलीत अंधार होतो.
Comments
Post a Comment