Skip to main content

जूनच्या पहिल्या आठवड्यात

प्रजासत्ताक देशात उगवलेल्या
जून महिन्यात व्यकुळतेला आलेलं उधाण
उन्हाच्या चटक्यात घाम फुटणाऱ्या त्वचेचे
शेतजमिनी सारखे नांगरले जाणारे नखांचे व्रण
चष्म्याच्या काचेवर येणार चहाचे फुंकर कण
एक एक पायरी चढून जाणारी ती गर्भवती
आणि शेजारी सार्वजनिक संडासावर वाढलेली गर्दी
बोळीच्या भिंत्तीवर "अल्ह्ड जवानी" चे चार पोस्टर
वारंवार झळकणारे ते स्तनाळ चित्र,
कोळश्यांनी लिहिले भडव्यांनी आपले फोन नंबर,
चिंक्की चाहिये या मालियाली मिलेगा सब अंदर

पानाच्या पिचकाऱ्या, सिगारेटीचे थूट, वास, दुर्घन्ध
सकाळी ७:०२ ची लोकल ची गर्दी येते कधी नाहीशी होते कधी
बूटपॉलिश वाल्यांच्या च्या टाप टाप आवाजात
किती खेटर्र आली गेली प्रत्येक बुटात होतेच का पाय?
चामडीच्या पोकळीला बुटांचे आकार चालवतात कि काय?

तो न्यूजपेपर विकत घेतो मी रंगीत पान मागून घेतो
हेडलाईन्स वाचून पारा चढतो म्हणून
त्यालाही रंगीत पान हवं असतं.
एका हाताने वारा घालत तो म्हणतो
न्यूजपेपर संडास मध्येच वाचलेला बरा असतो.
दुर्गंधात दुर्घन्ध जाणवत नाही.
काही गमावलं ह्याच दुःख नाही.

राष्ट्रवादी समाजवादी माओवादी
मायनॉरिटी बहुजन ब्राह्मण
सगळे जमतात देशभक्ती नूजचॅनेल वर ओकतात.
सगळ्यात प्रभावशाली अँकर असतो
त्याला सांगितल्याप्रमाणे सगळ्यांकडून
हवं तस वदवतो. मथळा छान रंगतो.

राजनेत्यांना देशाची काळजी लागते
तेव्हा हिमालय वितळू लागतो
कावळे आणि पारव्यांच्या निसर्गविधीचा सडा
पुतळ्यांवर होऊ लागतो.
त्यांच्या गुदमरण्याचा आभास
समागमात अडकलेल्या कुत्र्यांना होतो.

दिवस उगवतो दिवस मावळतो
उकाडा मात्र जसा च्या तसा
काचलेल्या जांघानी चालणं हा पराक्रम
घामोळ्यांच्या पाठीने निजणे हे शौर्याचं

क्रांतीही घडते अगदीच साखरझोप नसते
पक्षबदलाने नपुंसकांची गांड जळते.

जूनच्या पहिल्या आठवड्यात
पाऊस पडला नाही की आभाळ काळंभोर होतं, जीव गुदमरू लागतो.
सामान्य म्हणवणाऱ्या प्रत्येकाचा तो कणा दधिचीचा हळू हळू वाकू लागतो.









Comments

Popular posts from this blog

प्रश्न

।। प्रश्न ।। तू जरा  नाक फुगवून रुसून बसते,  उगाच, अकारण  लपवून काही पुटपुटते.   पौंगंडाचे लाडीक वेडे  वय तुझे खरपूससे.  मला वाटले  गालावरच्या पुरळाचे  किंवा काजळ पसरल्याचे  असेल नीताचे गाऱ्हाणे.  ती पुसते रागाने पण निरागस लाजेने  का दिले दैवाने स्त्रीस हे स्तनाचे ओझे ?  समानतेच्या शतका नंतर  अजुन उरले हे कोडे ?  मी पुरुषासम सक्षम  मी नजरेने नभ मोजीते.  मी म्हणालो -  पुरुष तसा कोमलमन स्त्री शक्ती त्याची,   तो बुरुज उभारी परी  तू  माती त्याची.  ती म्हणाली  समज नको उथळशी  हे उत्तर नाही प्रश्नाचे  गूढ कोणते छातीचे ?  मी बावरलो क्षणिक,  उत्तर कसे ते दयावे  हे वय असे, ना दिलासा निर्रुतराने  मी म्हणालो  आईने व आजीने मला न कोणी सांगितले  पण ऐक सांगतो  ताऱ्यांच्या पलीकडचे  कालाच्या उदयानंतरचे  सृष्टीच्या सुरवातीचे  सहस्त्र शिरीश्यांनच्या पुरुषाने  यज्ञाच्या योजनेने ब्रम्हांड बनविलें  हे तू ऐकिले असावे, तेव्ह...

सार -आसार 1

सूर्याची किरणे येतात अगदी सरळ रेषेत  अंगणात, गर्भगृहात, आणि डोहात  मृत्यू कसा येतो हे त्यांना विचारावे का ?  कुंठित प्रश्न अडकलेला दर्भात. 

उब

शहरावरचे काळे आकाश कोसळत आहे घरांवर, थेंबांनी नव्हे राखेने . लोक विचारतात ऋतू बदलणार का? कुतूहलाने नव्हे कुत्सितपने. रोज त्याचवेळी त्याच प्लॅटफॉर्मवर पकडतात तीच लोकल, आवडती जागा मिळाली नाही ह्याचही दुःख मिरवतात दिवसभर माणसे. जांघेमधल्या खाजेगत अकारण चिडतात माणसे. अकारन नाक मोठ्यानं शिंकरतात, खोकल्यावर जोराने स्वास घेतात, अकारण खांद्यांतून वाकून चालतात, अकारण इतरांच्या चुका काढतात, अकारण दारू पितात माणसे, अकारण सहवासही करतात माणसे. अकारण जगतोय का आपण? इतकं ठामपणे विचारतात की समोरच्याला लाज वाटावी स्वतःच्या जगण्याची आणि ऋषींसारखी ह्याच्या चेहऱ्यावर दाढी सत्वाची लिफ्ट बंद असली कि जिने चढतांना उतरतांना नाकात शिरतो दुर्गंध, ढेकणा सारखा! चिडक्या माणसांच्या घरांना लटकलीय वटवाघुळे त्यांच्याच चेहऱ्यांची सवयच असते ह्यांना विष्टा साचवण्याची. वारंवार सांगतात मला गरज नाही कुणाची. टोळी जवळ येणाऱ्या नर माकडांना आधी टोळीतल्या नराला पराभूत करावं लागत तेव्हाच मिळतात मादा, खायला ओली कणसे प्रेमाशिवाय संभोगाला तयार होतात ती माणसे . उबेसाठी जिथे तिथे स्पर्श शोधतात माणसे इ...