Skip to main content

बायको

कोणीतरी कोणावर आभाळाएव्हड प्रेम करतो
पण आभाळाच्या कुशीत शिरता येत नाही
तीस वर्ष्याच्या घोड्म्याला आईही मांडीवर बसवत नाही.
मग क्षणाची पत्नी आनंतकाळाची माया देणारी होते.
वात्स्यल्याला नसतो दुसरा पर्याय ती आत्म्याची छाया होते.
स्तनां बदलची जिज्ञासा, माया, कौतुक, आश्चर्य,प्रेम,
भावविश्वाची सहनशील पोलादी ढाल कमाल होते
"तिथेच पुरुषांचे भावते " अस ती म्हणते.

भिजू घातलेली कडधान्ये रात्रभर भिजतात
भांड्य बाहेर येतील इतकी ती फुगतात
अंकुर फुटलं तरी स्वतःला दुभागून उगवायच तिसरच काही
हाड नसलेल्या जिभेचे दोष एका शब्दाचे होते काही वाही
अबोल्याच्याच सकाळी नेमकी उसवते बाही
किंवा महत्वाच्या  कागदावर हवी असते सही.

पहाटे अलगद येतो एक हात छातीवर
अबोल्याच्या पाच रात्रींनंतर
केव्हडे वजन
हा… . .!
श्वास
अड्तोही, भराभर घेतोही
रेटीना च्या पापुद्र्यावर
घडी वर घडी
साखळी टाक्याला चुकलेली तू
उसवते एक एक कडी.

मग तुझा हात घसरत जातो छातीवरून
ढगांच्या मऊ कासव पावलांचा,
चढलेला आसतो मोराच्या धुंद कंठा मध्ये
ब्रम्ह लहरी नाद.
पुढे घड्याळीचे कुटील कारस्थान
किंवा दुधवाल्या माकडाचे भूभुक्कार
सारे रान ओस
नुसत्या ओल्या गवताचे पाते
झालेल्या अकाळी पावसाचे भाते.
रुतून पडलाय मऊ उशीच्या अभ्र्याला कान.
कोणते जनावर कोणता बाण ?

खिडकीच्या कुंड्यांवर केलेले प्रेम
कौलारू छतावर गुलेर्री नेम
कधी चुकून आलेले कबुतर पकड्लेय ?
दार, खिडक्या बंद करून दबोचलय ?
नाही ना ?
शिष्ठ अब्रूदार माणसाला शोभेल का ते ?
केरसुणीने पाल, झुरळ हाकलून लावतानाही
जागच्या जागी उड्या मारून
मुठीत जीव सांभाळणारा पैजाम्यातला माणूस!

तेव्हा रात्रीही बिना अनुमती …. असो

ह्या घरात चाललंय प्रेम संवाद

खिडकीच्या कुंडी मध्ये कबुतराने घातलेली अंडी
कावळ्यान पासून ती वाचवली
पण पिल उडून जाताच परत अन्डी ?
सस्यांचे ही असेच असते प्रेम निर्बंध !

पण माणसांचे तसे नाही ना ?
स्टूलावर उभाराहून कपडे वाळू घालतांना
स्वयंपाकघर बडबडले
कावळ्याने अंडी नेली आता कुंडीत
नवीन रोप लावा
कश्याला हवे फुलझाड उगाच
साधा क्याकट्स लावा.



Comments

Popular posts from this blog

प्रश्न

।। प्रश्न ।। तू जरा  नाक फुगवून रुसून बसते,  उगाच, अकारण  लपवून काही पुटपुटते.   पौंगंडाचे लाडीक वेडे  वय तुझे खरपूससे.  मला वाटले  गालावरच्या पुरळाचे  किंवा काजळ पसरल्याचे  असेल नीताचे गाऱ्हाणे.  ती पुसते रागाने पण निरागस लाजेने  का दिले दैवाने स्त्रीस हे स्तनाचे ओझे ?  समानतेच्या शतका नंतर  अजुन उरले हे कोडे ?  मी पुरुषासम सक्षम  मी नजरेने नभ मोजीते.  मी म्हणालो -  पुरुष तसा कोमलमन स्त्री शक्ती त्याची,   तो बुरुज उभारी परी  तू  माती त्याची.  ती म्हणाली  समज नको उथळशी  हे उत्तर नाही प्रश्नाचे  गूढ कोणते छातीचे ?  मी बावरलो क्षणिक,  उत्तर कसे ते दयावे  हे वय असे, ना दिलासा निर्रुतराने  मी म्हणालो  आईने व आजीने मला न कोणी सांगितले  पण ऐक सांगतो  ताऱ्यांच्या पलीकडचे  कालाच्या उदयानंतरचे  सृष्टीच्या सुरवातीचे  सहस्त्र शिरीश्यांनच्या पुरुषाने  यज्ञाच्या योजनेने ब्रम्हांड बनविलें  हे तू ऐकिले असावे, तेव्ह...

बदल

हे सारं दोघांचं आहे हे आपण दोघेही म्हणतो. तरीही मी म्हणतो बघ तुला काय आवडतंय तस ! पण पडद्यानं पासून उशीच्या अभ्रात्यांपर्यंत मी माझ्या आवडीचं घ्यायला लावलं हे तुझं म्हणणं. कॉमर्स वाल्यांना सौन्दर्यशास्त्र हि शिकवा असा पत्र शिक्षण मंत्र्यांना पाठवावं असं सारखं वाटतं. असो! मी म्हणतो काहीही असो मला एक फील वेगळा लागतो. हो !म्हणजे अगदी टूथब्रशही तुझ्याच आवडीचे? माझी माघार. मग गिरणीत काम करून पीठाशिवाय रहाणं जमलं नाही म्हणू की वखारीत कोळश्या शिवाय म्हणू . माझे तुझे रंग एकसारखे व्हयला लागले इतका माझा इगो तू पाळला मांजरासारखा आता मला आवडलेल तुला आवडायला लागल हे सगळ्यात वाईट झाल. तू कधी कधी इतरांना सागते इम्प्रोव यौर टेस्ट ! माझ्या खांद्यावर एक पक्षी बसतो , मला तो कावळाच वाटतो. तुला तो बगळा, इतक माझ्या मुळे तू बदलव इतका मीही आजून बदललो नाही ग! 

उब

शहरावरचे काळे आकाश कोसळत आहे घरांवर, थेंबांनी नव्हे राखेने . लोक विचारतात ऋतू बदलणार का? कुतूहलाने नव्हे कुत्सितपने. रोज त्याचवेळी त्याच प्लॅटफॉर्मवर पकडतात तीच लोकल, आवडती जागा मिळाली नाही ह्याचही दुःख मिरवतात दिवसभर माणसे. जांघेमधल्या खाजेगत अकारण चिडतात माणसे. अकारन नाक मोठ्यानं शिंकरतात, खोकल्यावर जोराने स्वास घेतात, अकारण खांद्यांतून वाकून चालतात, अकारण इतरांच्या चुका काढतात, अकारण दारू पितात माणसे, अकारण सहवासही करतात माणसे. अकारण जगतोय का आपण? इतकं ठामपणे विचारतात की समोरच्याला लाज वाटावी स्वतःच्या जगण्याची आणि ऋषींसारखी ह्याच्या चेहऱ्यावर दाढी सत्वाची लिफ्ट बंद असली कि जिने चढतांना उतरतांना नाकात शिरतो दुर्गंध, ढेकणा सारखा! चिडक्या माणसांच्या घरांना लटकलीय वटवाघुळे त्यांच्याच चेहऱ्यांची सवयच असते ह्यांना विष्टा साचवण्याची. वारंवार सांगतात मला गरज नाही कुणाची. टोळी जवळ येणाऱ्या नर माकडांना आधी टोळीतल्या नराला पराभूत करावं लागत तेव्हाच मिळतात मादा, खायला ओली कणसे प्रेमाशिवाय संभोगाला तयार होतात ती माणसे . उबेसाठी जिथे तिथे स्पर्श शोधतात माणसे इ...