Skip to main content

कल्चर शॉप मध्ये कविता वाचन



मी कविता वाचू लागलो की
त्यांचं पोट खळबळत संडास लागते
इतकी माझ्या शब्दांची प्रतिभा?  मला जाणवते! 
विंदा, सुर्वे, ढसाळ, चित्रे ऐकतायना ?

एका कविता वाचनाच्या कार्यक्रमात
विदेशी लोकांना आम्ही कविता भाषांतरित करूनहि ऐकवल्या
पण इंडियन इंग्लिश कवीना त्यांच्या कवितेचा अर्थ हिंदीत सांगता आला नाही
कार्यक्रमाचे तिकीट २०० रुपये कवी लोकांना चहाही विचारला नाही.

ओपन माईक सुरु होताच कळलं
ऐकणारेही कवीच होते
कवी प्रेक्षकांच्या रांगेत बसले
प्रेक्षक मंचावर गेले .

त्यांनी मग जाहिरात केली
फेसबुक वर सगळ्यांचे फोटो
मी माझा फोटो व दुसरा टाळ्या वाजवणाऱ्यांचा
लाईक केला. जे मित्र येऊ शकले नाही
त्यांनी कंमेंट केल्या
"तुझ्या सारखा दुसरा कवी होणे नाही"
विंदा, सुर्वे, ढसाळ, चित्रे ऐकतायना ?



Comments

Popular posts from this blog

प्रश्न

।। प्रश्न ।। तू जरा  नाक फुगवून रुसून बसते,  उगाच, अकारण  लपवून काही पुटपुटते.   पौंगंडाचे लाडीक वेडे  वय तुझे खरपूससे.  मला वाटले  गालावरच्या पुरळाचे  किंवा काजळ पसरल्याचे  असेल नीताचे गाऱ्हाणे.  ती पुसते रागाने पण निरागस लाजेने  का दिले दैवाने स्त्रीस हे स्तनाचे ओझे ?  समानतेच्या शतका नंतर  अजुन उरले हे कोडे ?  मी पुरुषासम सक्षम  मी नजरेने नभ मोजीते.  मी म्हणालो -  पुरुष तसा कोमलमन स्त्री शक्ती त्याची,   तो बुरुज उभारी परी  तू  माती त्याची.  ती म्हणाली  समज नको उथळशी  हे उत्तर नाही प्रश्नाचे  गूढ कोणते छातीचे ?  मी बावरलो क्षणिक,  उत्तर कसे ते दयावे  हे वय असे, ना दिलासा निर्रुतराने  मी म्हणालो  आईने व आजीने मला न कोणी सांगितले  पण ऐक सांगतो  ताऱ्यांच्या पलीकडचे  कालाच्या उदयानंतरचे  सृष्टीच्या सुरवातीचे  सहस्त्र शिरीश्यांनच्या पुरुषाने  यज्ञाच्या योजनेने ब्रम्हांड बनविलें  हे तू ऐकिले असावे, तेव्ह...

कसेही आणि काहीही च्या संदर्भात

नकोशी झालेली माणसे जवळच बाळगून  तो  घर सजविण्याच्या कल्पनेत रमतो,  कुणासाठीतरी महागडा बुके विकत घेतो  गाडीच्या मागच्या सीटवर मुद्दाम विसरतो.  चादरीला चारही कोपऱ्यात घट्ट बसवतो  वळ्या दुर करतो, स्वतः सोफ्यावर आडवा होतो.  पहिल्या प्रियेसीच वाढलेल्या पोटावर केलेलं कमेंट  वाचतो आणि डोळे मुद्दाम मिटतो.  शेव्हिग क्रीमच्या जाहिरातीत काय भारी ट्यून आहे  ती गुणगुणत आरश्यासमोर उभा राहतो, एक्सेल शीटच्या रिकाम्या रखान्यात  कानावरचे केस अलगद कात्रीने कापतो.   हरवलेल्या पावसाळी दिवसांची आठवण   मोरपिसांसारखी हळुवारच असावी अशी सक्ती नाहीना?  बंद पडलेलं घड्याळ दिवसातून दोनदा वेळ बरोबर दाखवते  एव्हडे तरी नीट आज आपण वागतोय ना?   बरेचदा प्रश्नही तेच ते पडतात   इतका रटाळवाणा दिवस जातो, ती वारंवार पदर नीट करते आणि  तो    फक्त चष्म्याच्या काचा स्वच्छ करतो.   आजकाल कुणाच्याही भेटीला जातो   काय बोलावे आधी विचार करतो   मरीन ड्राईव्ह पेक्षा कुर्ला स्टेशन वर ...

उब

शहरावरचे काळे आकाश कोसळत आहे घरांवर, थेंबांनी नव्हे राखेने . लोक विचारतात ऋतू बदलणार का? कुतूहलाने नव्हे कुत्सितपने. रोज त्याचवेळी त्याच प्लॅटफॉर्मवर पकडतात तीच लोकल, आवडती जागा मिळाली नाही ह्याचही दुःख मिरवतात दिवसभर माणसे. जांघेमधल्या खाजेगत अकारण चिडतात माणसे. अकारन नाक मोठ्यानं शिंकरतात, खोकल्यावर जोराने स्वास घेतात, अकारण खांद्यांतून वाकून चालतात, अकारण इतरांच्या चुका काढतात, अकारण दारू पितात माणसे, अकारण सहवासही करतात माणसे. अकारण जगतोय का आपण? इतकं ठामपणे विचारतात की समोरच्याला लाज वाटावी स्वतःच्या जगण्याची आणि ऋषींसारखी ह्याच्या चेहऱ्यावर दाढी सत्वाची लिफ्ट बंद असली कि जिने चढतांना उतरतांना नाकात शिरतो दुर्गंध, ढेकणा सारखा! चिडक्या माणसांच्या घरांना लटकलीय वटवाघुळे त्यांच्याच चेहऱ्यांची सवयच असते ह्यांना विष्टा साचवण्याची. वारंवार सांगतात मला गरज नाही कुणाची. टोळी जवळ येणाऱ्या नर माकडांना आधी टोळीतल्या नराला पराभूत करावं लागत तेव्हाच मिळतात मादा, खायला ओली कणसे प्रेमाशिवाय संभोगाला तयार होतात ती माणसे . उबेसाठी जिथे तिथे स्पर्श शोधतात माणसे इ...