डिजिटल झाला तरी रेडिओ खरखरतो काही गोष्टी स्वभाव बदलू देत नाही. हसण्याचाही प्रयत्न करावा लागतो खोटे दात खरे वाटावे इतका मी हसतो. अवघड होते कधी कधी चांगल्या शिव्या आठवत नाही असभ्य वागावे कधीतरी तर चेहर्या वरून जाणवत नाही काढा किंवा निकाढा, कडूपणा किती चांगला हे पटवून देण्याचा हुरूप आला की साखर वाढते. चाळीशीत बाप होतांना, नेमकं कुठल्या क्षमतांवर हायस वाटावं कुठल्या क्षमतांवर चिंता करावी. चष्मा आणि पांढरे केस, कशाला चढाओढ करावी. कर्तव्य असो किंवा हक्क कलम करून नमूद करत येतं नियम बाह्य ते प्रेमच पुन्हा सर्वत्र स्वीकार्य असतं. साधी संध्याकाळ पण कातरवेळ म्हणावी ही कवींची शब्द निवड, आपल्या म्हाताऱ्या बापासोबत सिनेमाला जावं ही आपली आवड.